चांदूर बाजार येथे सोलुफाईन अॅग्रीटेकचा पीक चर्चा सत्र उत्साहात संपन्न
सोलुफाईन अॅग्रीटेक प्रा. लि., सांगली यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांसाठी “Total Nutrisolution” या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेले पीक चर्चा सत्र शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी, गाव – मासोद, तालुका – चांदूर बाजार, जिल्हा – अमरावती येथे, चांदूर बाजार–परतवाडा रोडवरील अभिजित सुभाषराव वाकडे यांच्या शेतात उत्साहात व यशस्वीपणे पार पडले.
या कार्यक्रमात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोलुफाईन अॅग्रीटेकच्या वतीने पिकांच्या सर्वांगीण पोषण व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात श्री. सुभाष निकस (पाटील) – प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर तसेच
श्री. तानसेन भुरंगे (पाटील) – झोनल मॅनेजर, सोलुफाईन अॅग्रीटेक प्रा. लि.
यांनी शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढ, संतुलित पोषण, आधुनिक शेती तंत्रज्ञान व शाश्वत शेती याबाबत सखोल माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान सोल्यूफाईन अॅग्रीटेक प्रा. लि. यांच्या विविध उत्पादनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार कोणते उत्पादन, किती प्रमाणात व कोणत्या वेळेस वापरावे याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जुन्या पद्धतीऐवजी अद्ययावत प्रॉडक्ट बदल, योग्य मिश्रण पद्धत, फवारणीचे अंतर आणि त्यातून मिळणारे उत्पादनवाढीचे फायदे स्पष्ट करण्यात आले. संतुलित पीक पोषण, मुळांची मजबुती, फुलधारणा व दाणे भरणी सुधारण्यासाठी सोल्यूफाईन अॅग्रीटेकच्या उत्पादनांचा योग्य वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
श्री. सुभाष पंडितराव वाकडे (सरपंच),
श्री. नंदुभाऊ म. किटुकले (उपसरपंच)
तसेच प्रा. दादारावजी केशवरावजी किटुकले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन दत्तपूर्णा कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर उपक्रमांमुळे शेतीतील अडचणी सोडविण्यास मोठी मदत होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सोल्यूफाईन अॅग्रीटेक प्रा. लि. येणाऱ्या काळातही शेतकरी हितासाठी असे मार्गदर्शक व माहितीपूर्ण उपक्रम राबवत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमच्याशी संपर्क साधा:
📞 टोल-फ्री क्रमांक: 1800-202-2412
📧 ई-मेल: info@solufineagritech.com
🌐 वेबसाइट: www.solufineagritech.com
आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि अधिक माहिती मिळवा:
👉 https://www.facebook.com/solufineagritech
👉 https://www.instagram.com/solufine_agritech_maharashtra
▶️ YouTube
👉 https://youtube.com/@solufineagritechpvtltd








